जम्मू-काश्मीरमधील नौशेरा भागात दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत साताऱ्याचे सुपुत्र संदीप सावंत यांना वीरमरण आले. आज त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. संदीप सावंत यांचे पार्थिव कराड येथे आणण्यात आले. त्यानंतर कराडच्या ऐतिहासिक विजय दिवस चौकातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. संदीप यांच्या पार्थिवावर मुंढे या त्यांच्या मुळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. संदीप सावंत यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मुंढे गावात मोठी गर्दी करण्यात आली होती.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; आंबिवलीजवळ डंपरची रेल्वेगेटला धडक
मराठा लाईट इंफ्रंट्रीतील जवान संदीप सघुनाथ सावंत (२५ वर्ष) यांना दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आले. बुधवारी पहाटे नौशेरामध्ये दहशतवादी घुसखोरी करत असल्याची माहिती मिळाल्यावर लष्कराचे जवानांनी घटनास्थळी धाव घेत शोध मोहिम सुरु केली. त्याचवेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला होता. दहशतवाद्यांना केलेल्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत असताना साताऱ्याचे जवान संदीप सावंत आणि नेपाळमधील गोरखा रायफल्सचे जवान अर्जुन थापा मगर हे शहीद झाले होते.
बगदाद विमानतळावर रॉकेट हल्ला; टॉप कमांडर कासिम सोलीमनी ठार
संदीप सावंत हे मूळचे सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यातील मुंडे गावचे रहिवासी आहेत. संदीप सावंत यांच्या पाश्चात त्यांच्या पत्नी सविता आहेत. संदीप यांचा दीड वर्षांपूर्वीच विवाह झाला होता. त्यांना अवघ्या दोन महिन्यांची मुलगी आहे. नववर्षाच्या सुरुवातीलाच संदीप यांना वीरमरण आल्यामुळे सावंत कुटुंबियांसह मुंडे गावावर शोककळा परसरली आहे.