पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बुलढाण्यात जामवंती नदीत बुडून ४ तरुणांचा मृत्यू

नाल्यात पडून मुलाचा मृत्यू

बुलढाण्यात नदीमध्ये बुडून चार तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. जामवंती नदीमध्ये पोहण्यासाठी गेले असता ही घटना घडली आहे. चिखली शहरातील सैलानीनगर भागामध्ये राहणारे काही तरुण रविवारी नदीमध्ये पोहण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे चारही तरुणांचा बुडून मृत्यू झाला आहे. 

निवडणूक प्रचाराचा धडाका सुरु; 'या' ठिकाणी होणार दिग्गजांच्या सभा

सय्यद रिजवान सय्यद फिरोज, शेख साजिद शेख शफीक, वसीम शहा इरफान शहा, शेख तौफिक शेख रफिक अशी मृतकांची नावे आहेत. सैलानीनगर येथे राहणारे हे तरुण रविवारी सकाळी पोहण्यासाठी गेले होते. दुपारपर्यंत घरी न आल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी नदीकडे धाव घेत शोधाशोध केली असता नदीच्या पात्रामध्ये तरुणांचे मृतदेह आढळून आले. 

भारत कधीच हिंदू राष्ट्र होणार नाही: असदुद्दीन ओवेसी

स्थानिक नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने सर्व तरुणांचे मृतदेह बाहेर काढले. चारही तरुणांचे मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. हे चारही तरुण १६ ते २० वयोगटातील आहेत. या घटनेमुळे सैलानीनगर परिसरात शोककळा पसरली आहे. 

मोदी_परत_जा अन् राहुल लय भारी! ट्रेंडिंगमध्ये