पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

डहाणू, तलासरीमध्ये भूकंपाचे धक्के; एका महिलेचा मृत्यू

भूकंप मापनाचे छायाचित्र

पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी या भागात बुधवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. रात्री उशीरा सलग काहीवेळा हे धक्के जाणवल्याने रहिवासी घाबरले. बाहेर जोरदार पाऊस आणि घरात भूकंपाचे धक्के अशा दुहेरी अडचणीत स्थानिक सापडले होते. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, या भूकंपात भिंत अंगावर पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला. 

बुधवारी रात्री एक वाजून ३ मिनिटे ते एक वाजून १५ मिनिटे या कालावधीत भूकंपाचे चार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता ३.८, ३.६, २.९ आणि २.८ इतकी होती. हवामान विभागाकडून ही माहिती मिळाली आहे. बुधवारी संध्याकाळपासूनच या भागात भूकंपाचे धक्के जाणवत असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले. संध्याकाळच्या सुमारास सहा ते सात धक्के जाणवल्याचे नागरिकांनी म्हटले आहे. पण त्याची तीव्रता किती होती हे समजू शकलेले नाही.

'बी टेक'ची फी भरण्यास पैसे नसल्यानं १७ वर्षीय विद्यार्थीनीची आत्महत्या

मंगळवारी रात्रीपासूनच या भागात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यातच भूकंपाचे धक्के जाणवल्याने अनेक स्थानिकांना घराच्या बाहेरही पडता येत नव्हते. एकामागून एक धक्के जाणवत असल्याने स्थानिक लोक घाबरल्याचे पाहायला मिळाले.