पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... या ४ कारणांमुळे भाजप-शिवसेनेत जागा वाटपावर लवकर एकमत होणे अवघड

भाजप शिवसेना युतीला पुन्हा एकदा जास्त जागा मिळण्याचा अंदाज

पुढील महिन्यात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागा वाटपाची प्राथमिक बोलणी बुधवारी सुरू झाली. एकूण २८८ जागांपैकी कोणत्या जागेवर कोणी उमेदवार उभे करायचे यावर यावेळी चर्चा झाली. 

लोकसभा निवडणुकीवेळी विधानसभेची निवडणूक युतीने लढवू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. पण त्यानंतर बऱ्याच घडामोडी घडल्या आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात महाजनादेश यात्रा काढली. तर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी जनसंवाद यात्रा काढली. दोन्ही पक्षांकडून आपापली ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. इतर राजकीय पक्षांचे नेतेही या दोन्ही पक्षांमध्ये सहभागी होत आहेत.

राज्यातील गडकिल्ले लग्न समारंभासाठी भाड्याने मिळणार: सरकारचा निर्णय

२०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढविली होती. त्यावेळी भाजप १२२ तर शिवसेना ६३ जागांवर विजयी झाली होता. लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष युती करूनच निवडणुकीला सामोरे गेले होते. त्यावेळी भाजपने २५ तर शिवसेनेने २३ जागांवर उमेदवार उभे केले होते. 
विधानसभा निवडणुकीची जागा वाटपाची चर्चा लोकसभा निवडणुकीइतकी सोपी नाही. शिवसेना विधानसभेत जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यासाठी आक्रमक असणार हे नक्की आहे. या सर्व पार्श्वभूमीवर खालील चार घटक महत्त्वाचे ठरणार आहेत...

१. युती करायची ठरली तरी जागा वाटप नक्की कसे करणार हे अद्याप निश्चित झालेले नाही. भाजप आणि शिवसेना २८८ पैकी नक्की किती जागा लढविणार हे जाहीर करण्यात आलेले नाही. दोन्ही पक्ष जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढविण्यासाठी प्रयत्नशील आहे.

२. २०१४ च्या निवडणुकीत शिवसेना मोठ्या भावाची भूमिका गमावून बसला होता. शिवसेनेला भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या होत्या. यावेळी शिवसेना पुन्हा एकदा मोठ्या भावाच्या भूमिकेत जाण्यासाठी प्रयत्नशील आहे. २१०४ आधीच्या निवडणुकीत युतीमध्ये शिवसेनेने भाजपपेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढविली होती. पण मागील निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांची एंट्री झाल्यामुळे भाजपने निम्म्या जागांची मागणी केली होती.

जे औरंगजेबाला जमलं नाही ते सरकारनं करून दाखवलं: अमोल कोल्हे

३. युती झाली तरी मुख्यमंत्री कोणाचा यावरून दोन्ही पक्ष अद्याप काहीही बोलण्यास तयार नाहीत. भाजपकडून सध्यातरी देवेंद्र फडणवीसच पुढील मुख्यमंत्रीपदासाठीही दावेदार आहेत. पण शिवसेनेकडून आदित्य ठाकरे यांच्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. आदित्य ठाकरे हे ठाकरे कुटुंबातील निवडणूक लढविणारे पहिलेच सदस्य ठरणार आहेत.

४. रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाचे काय करायचे यावरूनही दोन्ही पक्षांमध्ये एकमत नाही. रिपब्लिकन पक्षासाठी आपल्या वाट्यातील जागा सोडण्यास शिवसेना उत्सुक नसल्याचे जाणवते. आठवले यांना सोबत घेऊन निवडणूक लढविण्याचे भाजपचे नियोजन आहे. पण शिवसेना याबाबत फार आग्रही नाही.