पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अहमदनगरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांची आत्महत्या

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

अहमदनगर जिल्ह्यामध्ये धक्कादायक घटना समोर आली आहे. एकाच कुटुंबातील चौघांनी आत्महत्या केली आहे. पारनेर तालुक्यातील गुणोरे गावामध्ये ही घटना घडली आहे. शेतकरी कुटुंबातील आई-वडील आणि दोन मुलांनी आत्महत्या केली आहे. या घटनेची माहिती मिळताच पारनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांकडून घटनेचा तपास सुरु आहे. दरम्यान, आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून या घटनेमुळे पारनेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. 

राहुल गांधींच्या काश्मीर दौऱ्यावर मायावती संतापल्या

बाबाजी विठ्ठल बढे (वय ३७), पत्नी कविता बढे (३५ वर्ष), मुलगा आदित्य बढे  (१५ वर्ष) आणि धनंजय बढे (१२ वर्ष) अशी आत्महत्या केलेल्या चौघांची नावं आहेत. चौघांनी घरामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. बढे कुटुंबिय रोज सकाळी लवकर उढतात. मात्र आज त्यांच्या घराचे दरवाजे आणि खिडक्या बंद होत्या. त्यामुळे त्यांच्या घराजवळून जाणाऱ्या एका गावकऱ्याने त्यांना आवाज दिला. कोणाचेही काहीच उत्तर न मिळाल्यामुळे त्यांनी खिडकी उघडली असता हा सर्व प्रकार उघड झाला. 

मनमोहन सिंग यांची एसपीजी सुरक्षा हटवणार

या घटनेनंतर गावकऱ्यांनी पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. बाबाजी यांची पत्नी कविता या मानसिकरित्या आजारी होत्या तर आदित्य हा दिव्यांग होता. सातवीत शिकणारा धनंजय शाळेत अतिशय हुशार होता. बढे कुटुंबियांनी आत्महत्या कोणत्या कारणांमुळे केली याविषयी अद्याप माहिती समोर आलेली नाही. दरम्यान, पोलिसांकडून तपास सुरु आहे. चौघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे.  

'जम्मू-काश्मीरच्या राज्यपालांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष बनवा'