पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नगरमध्ये ट्रक- कारच्या भीषण अपघात चौघांचा मृत्यू

अहमदनगर अपघात

अहमदनगरमध्ये ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अहमदनगर- दौंड महामार्गावरील बाबुर्डी बेंदजवळ हा अपघात झाला आहे. मध्यरात्री अडीचच्या सुमारास ही घटना घडली आहे. 

पुण्यात पावासाने घेतला ६ जणांचा बळी; ४ जण वाहून गेल्याची शक्यता

श्रीगोंद्यावरुन नगरच्या दिशेने येणाऱ्या कारने ट्रकला धडक दिली. बाबुर्डी बेंद परिसरातील महादेव वस्तीजवळ हा भीषण अपघात झाला. या अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी तीन जण भिंगार गावातील तर एक जण वाळकी येथील आहे. शुभम विलास खेडकर (रा. वाळकी, अहमदनगर), अनिकेत मच्छिंद्र भुजबळ, गोपी कुरहाडे, यासिन पठाण (तिघे राहणार भिंगार, अहमदनगर) अशी अपघातातील मृतांची नावं आहेत. 

पुण्याला पावसाने झोडपले; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी

अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी घटनास्तळी धाव घेतली. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला आहे. तर ट्रकचे देखील नुकसान झाले आहे. अपघाताचा तपास अहमदनगर पोलिसांकडून सुरु आहे. मृतांमधील तीन जण भिंगार गावचे असल्याने गावावर शोककळा पसरली आहे. 

मोदी-ट्रम्प मित्रत्व पाहूनही इम्रान यांना शत्रुत्वापलिकडे काही