पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बंदुकीचे लॉक काढताना गोळी सुटली; चौघे जखमी

जळगाव गोळीबार

भुसावळमध्ये सुरक्षा रक्षकाच्या बंदुकीतून अचानक गोळी सुटल्याने ४ जण जखमी झाले आहेत. वरणगाव येथील सेंट्रेल बँकेच्या शाखेमध्ये ही घटना घडली आहे.  मंळवारी दुपारी बँकेमध्ये मोठी गर्दी असताना ही घटना घडल्याने खळबळ उडाली. गोळी लागल्याने तीन महिलांसह एक व्यक्ती जखमी झाला आहे. जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान यामधील एका महिलेची प्रकृती गंभीर आहे. 

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 'अमृत' संस्थेची स्थापना होणार

लालचंद चौधरी असं या सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. त्याच्याकडे असलेली डबल बोअरची बंदुक अचानक लॉक झाली होती. लॉक काढण्याचा प्रयत्न करत असताना चुकून त्याचे बोट ट्रीगरवर गेल्याने बंदुकीतून गोळी सुटली. ही गोळी बँकेमध्ये उपस्थित असलेल्या लोकांना लागली. यामध्ये प्रमिला लोहार (तळवेल), शोभा माळी (वरणगाव), कमलाबाई चौधरी (वरणगाव) आणि राधेश्याम जैस्वाल (वरणगाव) हे जखमी झाले. बंदुकीचा आवाज आल्यामुळे बँकेमध्ये उपस्थित असलेल्या लोकांची एकच धावपळ झाली. 

चिदंबरम यांचा अटकपूर्व जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला

दरम्यान, वरणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गोळी लागलेल्या चौघांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरु असून एकाची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. तर पोलिसांनी सुरक्षा रक्षकाला ताब्यात घेतले असून तपास सुरु केला आहे. या घटनेमुळे वरणगावामध्ये एकच खळबळ उडाली आहे. 

ईडी कार्यालयाबाहेर येऊ नये; राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना आवाहन