पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक!, महाराष्ट्रातील १५ खासदारांवर गंभीर गुन्हे; चौघांची संपत्ती १०० कोटींपेक्षा जास्त!

संसद भवन

महाराष्ट्रातून लोकसभेवर निवडून गेलेल्या ४८ खासदारांपैकी २८ जणांवर विविध गुन्हे आहेत. त्यापैकी १५ जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. यामध्ये खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांचा समावेश आहे. भाजप आणि शिवसेनेच्या अनुक्रमे सहा आणि पाच नवनिर्वाचित खासदारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे आहेत. विविध उमेदवारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्राच्या आधारे महाराष्ट्र इलेक्शन वॉच आणि असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स यांनी वरील माहिती दिली. 

मिशन साऊथ!, २०२४च्या निवडणुकीत भाजपचे लक्ष्य ३३३ जागा

या संदर्भात असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सचे अनिल वर्मा म्हणाले, खासदार म्हणून निवडून जाणाऱ्या व्यक्तीवर विविध गुन्हे आहेत ही चिंतेची बाब आहे. २००९ मध्ये हे प्रमाण ३० टक्के होते. २०१४ मध्ये ते ३४ टक्क्यांपर्यंत वाढले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत हे प्रमाण ४३ टक्क्यांपर्यंत जाऊन पोहोचले आहे. गंभीर स्वरुपाचे गुन्हे असण्याचे प्रमाणही वाढले आहे. यावरून हेच सिद्ध होते की ज्यांच्याकडे पैसे असतात आणि ज्यांना दादागिरी करता येते, अशाच व्यक्ती लोकसभेत खासदार म्हणून निवडून जाण्याचे प्रमाण वाढते आहे. राजकीय पक्षही निवडून येण्याची क्षमता एवढा एकच घटक महत्त्वाचा मानतात.

नरेंद्र मोदींच्या शपथविधीला BIMSTEC राष्ट्रांचे नेतेही उपस्थित राहणार

महाराष्ट्रातून निवडून गेलेल्या एकूण ४८ खासदारांपैकी ४ खासदारांची संपत्ती १०० कोटींहून अधिक असल्याचेही या संस्थेने केलेल्या अभ्यासातून दिसून आले. साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे महाराष्ट्रातून निवडून गेलेले सर्वाधिक श्रीमंत खासदार आहेत. त्यांची संपत्ती १९९ कोटी रुपये आहे. त्यांच्या खालोखाल बारामतीतून निवडून गेलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांचा नंबर लागतो. त्यांची संपत्ती १४१ कोटी रुपये आहे. माढ्यातील भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हे तिसऱ्या क्रमांकावर असून, त्यांची संपत्ती १२८ कोटी रुपयांची आहे. तर मावळमधून निवडून गेलेले शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांची संपत्ती १०२ कोटी रुपयांची आहे. 

संपत्तीच्या यादीमध्ये सर्वात खालच्या क्रमांकावर जळगावमधून निवडून गेलेले खासदार उन्मेष पाटील यांचा नंबर लागतो. त्यांची संपत्ती सर्वांत म्हणजे १.२३ कोटी रुपयांची आहे. दोन कोटींपेक्षा कमी संपत्ती असलेल्या खासदारांची संख्या ४ आहे. दहा कोटींपेक्षा जास्त संपत्ती असलेल्या खासदारांची संख्या २५ आहे.