खारघरमधील पांडवकडा धबधब्यात चार तरुणी वाहून गेल्या आहेत. त्यातल्या तीन तरुणींचा मृहदेह हाती लागला असून दोघींचा शोध सुरू आहे. या चारही तरुणी कुर्ला आणि चेंबूरच्या रहिवाशी असल्याचं समजत आहे. खारघर आणि बेलापूरदरम्यान हा धबधबा आहे. पावसात या परिसरात नैसर्गिक धबधबा तयार होतो. त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
मुळशीत २४ तासांत ४३४ मिमी पाऊस, पानशेतही १०० टक्के भरले
या चारही तरुणी नेरुळच्या एसआयइएस महाविद्यालयाच्या विद्यार्थिंनी असल्याचं समजत आहे. त्यातल्या तिघींचा मृतदेह सापडला असून उर्वरित दोघींचा शोध सुरू आहे. वाहून गेलेल्या विद्यार्थिनींचा शोध धबधब्याच्या तीन किलोमीटरच्या परिसरात घेतला जात आहे.