पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मराठवाड्यात एका दिवसात ४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

राज्यामध्ये सध्या भीषण दुष्काळ परिस्थिती आहे. गेल्या दोन ते तीन वर्षापासून मराठवाड्यातील शेतकरी दुष्काळाचा सामना करत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरुच आहे. एका दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये चार शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. सततचा दुष्काळ, नापिकी, कर्जबाजारीपणा यामुळे बीड जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी, नांदेडमधील एका शेतकऱ्याने तर लातूरमधील एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे.  

इंग्लंडच्या पंतप्रधानपदी बोरिस जॉन्सन, बुधवारी औपचारिक पदग्रहण

पहिली घटना - सततचा दुष्काळ, नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून बीड जिल्ह्यातील दोन तरुण शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे. वडवणी तालुक्यातील देवडी येथील नागेश भिकाजी नाईकवाडे (२५ वर्ष) या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. नागेश नाईकवाडे या शेतकऱ्याने शेतीसाठी कर्ज काढले होते. कर्जबाजारीपणा, मालाला योग्य भाव मिळत नसल्याने आणि नापिकीमुळे त्याने आत्महत्या केली. नागेशने शेताता जाऊन विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. 

खूशखबर!, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनाही सातवा वेतन 

दुसरी घटना - बीडमधील धारूर तालुक्यांतील मोहखेड धनखिळा तांडा येथील योगेश किशन राठोड (२० वर्ष) या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. योगेश राठोडने आर्थिक विवंचनेतून शेतामध्ये गळफास लावून आत्महत्या केली. योगेश बीएससीचे शिक्षण घेत होता. मात्र मागच्या वर्षी शेतात काहीच पिकले नाही त्यामुळे त्याला कॉलेज सोडून ऊस तोडणीला जावे लागले होते. यावर्षी देखील तिची परिस्थिती आल्यामुळे शिक्षण आणि घर कसे चालवायचे या चिंतेतून त्याने आत्महत्या केली. 

अ‍ॅशेस २०१९ : आता कसोटीतही दिसणार रंगबेरंगी जर्सीतील 'ती' 

तिसरी घटना -  सततची नापिकीला कंटाळून नांदेडमध्ये तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. भोकर तालुक्यातील दिवशी गावातील संतोष कदम (३५ वर्ष) या शेतकऱ्याने आत्महत्या केली. दीड महिना संपला तरी जिल्ह्यात पाऊस पडला नाही. सततची नापिकी आणि कर्जाचा वाढता डोंगर याला कंटाळून संतोष कदम या शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या केली. त्यांच्या पाश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आणि आई असा परिवार आहे. या घटनेमुळे दिवशी गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. 

'मराठा क्रांती ठोक मोर्चा' विधानसभेच्या सर्व जागा लढवणार

चौथी घटना - लातूर जिल्ह्यामध्ये अद्यापही म्हणावा तसा पाऊस पडला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. शेती मशागतीसाठी हजारो रुपये खर्च करूनही अद्याप पेरणी नाही. तर कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा कसा या विवंचनेतून लातूर तालुक्यातील रायवाडी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. शिवाजी ज्ञानोबा पवार (४५ वर्षे) असं या शेतकऱ्याचे नाव असून त्यांनी विष प्राशन करुन आत्महत्या केली आहे. पेरणीच झाली नाही तर जगायचे कसे या विवंचनेतून त्यांनी आपले जीवन संपवले. त्यांना २ मुले आणि २ मुली असून एक मुलगी लग्नाची आहे. त्यांच्यावर सिद्धेश्वर सहकारी बँकेचे २ लाखांचे कर्ज आहे.

युवीनं लाराला सांगितला गांगुलीच्या 'दादागिरी'चा किस्सा