पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हंसराज अहीर यांच्या ताफ्यातील गाडीला भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

चंद्रपूर अपघात

महाराष्ट्राचे माजी केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या ताफ्यातील गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. चंद्रपूर-नागपूर महामार्गावर ही घटना घडली आहे. हंसराज अहिर सुखरुप आहेत.

कऱ्हा नदीला पूर; नदीकाठच्या गावांमध्ये शिरले पाणी

चंद्रपूरवरुन नागपूरच्या दिशेने जात असताना भरधाव वेगात आलेल्या ट्रकने हंसराज अहिर यांच्या ताऱ्यातील सीआरपीएफच्या गाडीला जोरदार धडक दिली. वर्धा जिल्ह्यातील कांडळी गावाजवळ सकाळी ८.३० वाजता हा अपघात झाला. या अपघातामध्ये सीआरपीएफ जवान आणि एका महाराष्ट्र पोलिसाचा मृत्यू झाला आहे. 

पुण्यात पावसाने घेतला १२ जणांचा बळी; चौघे बेपत्ता

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस या अपघाताच्या तपासाला सुरुवात केली आहे. सुदैवाने या अपघातात हसंराज अहिर सुखरुप आहे. अपघातामध्ये हसंराज अहिर यांच्या ताफ्यातील गाडीचा चक्काचूर झाला आहे. 

पुण्यात पावसाने नक्की काय झालंय डोळ्याने पाहा...