पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धुळे : शिकारीच्या शोधात विहारीत पडलेल्या बिबट्याची सुटका

विहिरीत पडलेल्या बिबट्याची सुटका

धुळे जिल्ह्यातील साक्री येथे विहरीत पडलेल्या बिबट्याला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले आहे. साक्री तालुक्यातील काशीपूर शिवारात शिकारीच्या शोधात फिरणारा बिबट्या विहिरीत पडला होता. वन विभागाच्या मदतीने या बिबट्याला बाहेर काढण्यात आले.

काशीपूर येथील शेतकरी सोमा मारनर हे शेतातील कांद्याच्या रोपाला पाणी देण्यासाठी शेतात गेले होते. त्यावेळी त्यांनी पाण्याची मोटर चालू करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती चालू झाली नाही. त्यामुळे ते विहिरीतील मोटरची वायर तपासण्यासाठी गेले असताना विहिरीत बिबट्या पडलेला त्यांना दिसला. दरम्यान त्यांनी आसपासच्या शेतकऱ्यांना याची माहिती दिली. बिबट्याला पाहण्यासाठी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. 

या घटनेची माहिती मिळताच साक्री वन अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तब्बल चार तासांच्या प्रयत्नांनंतर पिंजरा आणि क्रेनच्या सहाय्याने बिबट्याला बाहेर काढण्यात त्यांना यश आले.बिबट्याला पिंजऱ्यात कैद करून कोंडाईबारी जंगलात सोडण्यात आले आहे.