पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

महापूरामुळे १ लाख हेक्टर क्षेत्रातील ऊस शेतीचे नुकसान

ऊस शेती

महाराष्ट्रतील कोल्हापूर, सातारा आणि सांगली या तीन जिल्ह्यांचे महापूरामुळे मोठे नुकसान झाले आहे. महापूरामुळे या भागातील १ लाख हेक्टर क्षेत्रावरील ऊस शेतीची मोठे नुकसान झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांचे तब्बल २,२०० कोटींपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आला आहे. सांगली आणि कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाची लागवड केली जाते. महाराष्ट्रामध्ये एकट्या सांगली आणि कोल्हापूरमध्ये एकूण ऊस पिकांच्या सुमारे २५ टक्के लागवड केली जाते. आता या भागामध्ये ऊस शेतीचे नुकसान झाल्यामुळे साखर उद्योगाला मोठा फटका बसणार आहे. 

PM Modi's speech: नवा भारत थकून थांबणारा नाही : मोदी

मुसळधार पावसाने पश्चिम महाराष्ट्राला झोडपून काढले. या पावसामुळे नद्यांना आलेल्या महापूरामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये थैमान घातले. नदीकाठच्या गावांमध्ये, शेतीमध्ये पाणी शिरले. या पूरामुळे शेतीमधील पिकं वाहून गेली तसंच तब्बल १५ दिवस ऊसाच्या शेतामध्ये पाणी राहिले. त्यामुळे ऊस कुजायला सुरुवात झाली आहे. काही भागातील ऊसाची शेती पूर्णत: नष्ट झाली आहे. सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यामध्ये ३० टक्के ऊस पिकाला मोठा फटका बसला आहे. सध्या ऊस शेतीचे पंचनामे केले जात आहे.

'सेनेच्या आंदोलनामुळे १० लाख शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम  

दरम्यान, देशामध्ये उत्तरप्रदेशनंतर साखर उत्पादनात महाराष्ट्राचा दुसरा नंबर लागतो. राज्यामध्ये २०१६-१७ या कालावधीमध्ये ४.२ दक्षलक्ष टन, २०१७-१८ या कालावधीमध्ये १०.७ दक्षलक्ष टन आणि २०१८-१९ या कालावधीमध्ये १०.१ दक्षलक्ष टन ऐवढे साखर उत्पादन झाले. मात्र आता २०१९-२० मध्ये दुष्काळ आणि पूरस्थितीमुळे साखर उत्पादन फक्त ७ ते ७.५ दक्षलक्ष टनापर्यंत जाईल असा अंदाज वर्तवला जात आहे.

Photos : आगीनं धुमसतंय अ‍ॅमेझॉनचं जंगल

महापूरामुळे तिन्ही जिल्ह्यातील ऊसासह इतर पिकांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. कोल्हापूरमध्ये १.०६ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. सांगलीमध्ये ६६ हजार ०९६ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. तर साताऱ्यामध्ये ३८ हजार २२५ हेक्टर क्षेत्रातील शेतीचे नुकसान झाले आहे. 

तेल कंपन्यांनी एअर इंडियाचा इंधन पुरवठा रोखला