पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जळगावमध्ये अंगावर वीज पडून ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू

दक्षिण सोलापूरः वीज पडून एका महिलेसह तिघांचा मृत्यू

जळगावमध्ये दुर्देवी घटना घडली आहे. शेतामध्ये काम करत असताना अंगावर वीज पडून ५ जणांचा मृत्यू झाला आहे. धरणगाव तालुक्यातील भवरखेडा गावामध्ये गुरुवारी दुपारी ही दु:खद घटना घडली आहे. मृतांमध्ये चार महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे. यामधीली ४ जण एकाच कुटुंबातील आहेत. 

अण्णांकडून पवारांना क्लीनचीट; चौकशीची केली मागणी

भवरखेडा येथील रघुनाथ पाटील (५० वर्ष) यांच्या शेतावर ज्वारी कापणीचे काम सुरु होते. रघुनाथ यांच्यासोबत त्यांच्या पत्नी दोनी सुना आणि कामासाठी आलेली एक महिला असे ५ जण ज्वारी कापणीचे काम करत होते. अचानक रिमझिम पावसासह ढगांचा गडगडाट होऊ लागल्यामुळे हे सर्व जण शेतातील एका झाडाखाली जाऊन थांबले. त्यावेळी अचानक त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. 

पीएमसी बँकेच्या खातेदारांना रिझर्व्ह बँकेचा दिलासा

रघुनाथ पाटील (५० वर्ष), त्यांची पत्नी अलका पाटील (४५ वर्ष), मोठी सून शोभा पाटील (३३ वर्ष), छोटी सून लता पाटील आणि (३० वर्ष) आणि कल्पना पाटील (३५ वर्ष) अशी मृतांची नावं आहेत. घटनेची माहिती कळताच धरणगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेमुळे भवरखेडा गावावर शोककळा परसरली आहे. 

एका क्लिकमध्ये वाचा पुण्यात बुधवारी रात्री नक्की घडले काय?