पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हँडवॉशने हात धुवा, मगच किराणा माल मिळेल; सोलापुरातील दुकानदाराचा उपक्रम

पापरी येथील किराणा दुकानदार प्रशांत शहा हे ग्राहकाने हँडवॉशने हात धुतल्यानंतरच त्याला माल देत आहेत.

हँडवॉशने हात धुतल्यानंतर दुकानातील किराणा माल दिला जाईल, अशी अटच ग्रामीण भागातील एका किराणा व्यावसायिकाने घातली आहे. पापरी (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील प्रशांत शहा यांनी कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी स्वतः पुढाकार घेतला आहे. दुकानात ग्राहकाना नजरेसमोर दिसेल असा हाताने लिहिलेला सूचना फलकच लावला आहे. दुकानाच्या काऊंटरवर व पायरीवर ग्राहक दुकानात येण्याच्या ठिकाणी हात धुण्यासाठी हँडवॉश व पाण्याची सोय त्यांनी केली आहे.

कोरोनामुळे इटलीत ६०७७ जणांचा मृत्यू, ६३००० हून अधिक लोकांना लागण

कोरोनो विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी सरकार दिल्ली ते गल्लीपर्यंत विविध कठोर निर्णय व उपक्रम राबवत आहे. पण फक्त प्रशासनावर अवलंबून न राहता भारताचे नागरिक म्हणून आपलीही काहीतरी जबाबदारी व कर्तव्ये आहेत. ती आपण पार पाडली पाहिजेत या विचाराने प्रशांत शहा यांनी पुढाकार घेऊन ही कल्पना अंमलात आणली आहे. त्यांनी दुकानात आलेल्या ग्राहकाने हॅंडवॉशने हात धुतल्यानंतरच किराणा माल देत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचे ग्राहकांनीही स्वागत केले आहे. त्यांना चांगला प्रतिसादही मिळाला आहे.

कोरोनाच्या १५ रुग्णांची प्रकृती सुधारली, लवकर डिस्चार्ज : आरोग्यमंत्री

सध्या मोठ्या शहरातील हायपर मार्केटमध्ये अशा प्रकराची सावधगिरी बाळगली जात आहे. पण पापरीसारख्या अगदी छोट्या गावातही अशा प्रकारची सुविधा देऊन ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घेतली जात असल्याचे दिसत आहे. 

नागरिक म्हणून आपलीही जबाबदारी 
टीव्हीवर, वृत्तपत्रातून कोरोनो विषाणू संसर्ग व त्याची वाढत चाललेली व्याप्ती पाहून भीती वाटत आहे. सरकार तर ते रोखण्याचा प्रयत्न करतच आहे. पण आपण ज्या समाजात, गावात राहतो. त्याप्रती नागरिक म्हणून आपलीही एक जबाबदारी बनते. म्हणून दुकानात आलेल्या ग्राहकास मी हॅंडवॉशने हात धुण्यास प्रवृत्त करुन त्यांना किराणा माल देत आहे.
- प्रशांत शहा (किराणा व्यावसायिक, पापरी, जि. सोलापूर)

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:first Wash hands with a handwash then get groceries papris solapur Shopkeeper scheme due to coronavirus