पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शेतात का आली असा जाब विचारत तिहेरी तलाक; उस्मानाबादमध्ये गुन्हा दाखल

ट्रिपल तलाक

शेतात का आलीस असा जाब विचारत, पत्नीला तिहेरी तलाक देणाऱ्या एका व्यक्ती विरोधात उस्मानाबाद जिल्ह्यात गुन्हा दाखल झाला आहे. रियाज बाशुमियां पटेल (रा. शेलगाव (ज), ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तिहेरी तलाकप्रकरणी गुन्हा दाखल होण्याची उस्मानाबाद जिल्ह्यातील ही पहिलीच घटना आहे. येरमाळा पोलिस याप्रकरणी तपास करत आहेत. 

वंचितच्या उमेदवाराचा सायकलवरुन प्रचार

अधिक माहिती अशी, पीडित महिला आज (शनिवार) शेतात काम करत असताना तिचा पती रियाज पटेल हा तिथे आला आणि त्याने तू या शेतात का आलीस. तुझा या शेताशी काही संबंध नाही, मी तुला तलाक देतो, असे म्हणत त्याने पीडित महिलेला तीनवेळा तलाक असे उच्चारुन मारहाण केली. तसेच जीवे मारण्याची धमकी दिली. 

जम्मू-काश्मीरः श्रीनगरमधील लाल चौकाजवळ ग्रेनेड हल्ला

पीडित महिलेने याप्रकरणी रियाज पटेल याच्या विरोधात दाखल केलेल्या तक्रारीवरुन येरमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, मुस्लिम महिला (विवाह हक्क सुरक्षा) अध्यादेश २०१८ नुसार तिहेरी तलाक हा गुन्हा असून, तो सिद्ध झाल्यास आरोपीला तीन वर्षांची शिक्षा सुद्धा होऊ शकते.

कर्नाटकचे माजी उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांच्या पीएची आत्महत्या