पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर करणार : मुख्यमंत्री

उद्धव ठाकरे (PC Mohd Zakir)

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसध्येला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कर्जमाफीची पहिली यादी सोमवारी जाहीर करणार असल्याचे म्हटले आहे. सुरुवातीला प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांतील शेतकऱ्यांची यादी जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. तीन महिन्यात पारदर्शकपणे कर्जमाफीची प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असेही ते म्हणाले. महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी महाविकास आघाडी सरकारची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी चहापानावर बहिष्कार टाकणाऱ्या विरोधकांनी केलेले आरोपही उद्धव ठाकरे यांनी फेटाळून लावले.   

एवढं गोंधळलेलं सरकार मी पाहिलं नाहीः फडणवीस

वारेमाप आरोप करणे म्हणजे विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणे नाही. सरकारच्या चांगल्याला कामाचे कौतुक करायला शिका. व्यथा मांडाव्या पण सरकार काही करतच नाही, असे म्हणने अयोग्य आहे. सरकार स्थिरावले आहे. आम्ही काम करत आहोत. ते विरोधकांना पचनी पडलेले नाही. त्यामुळे ते वारेमाप आरोप करत आहेत. आम्ही नुसत्या घोषणा केल्या नाहीत तर कामे करुन दाखवली, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

महाराष्ट्रात दिल्ली पॅटर्नची तयारी, केजरीवाल मदतीसाठी 'राजी'

तूर खरेदीसंदर्भात विरोधकांनी केलेले आरोपही महाविकास आघाडी सरकारने यावेळी फेटाळून लावले. राज्य सरकारने ३०६ केंद्राच्या माध्यमातून ६२ हजार क्विंटल तूर खरेदी केली आहे, अशी माहिती उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिली. कर्जमाफीची प्रक्रिया ही संगणकिय प्रणालीतून होणार आहे. एकाचवेळी यादी जाहीर केल्याने तांत्रिक अडचणी उद्भवू नयेत, या अनुषंगाने पहिल्या यादीमध्ये मर्यादीत नावांचा समावेश असेल, असेही अजित पवार यांनी यावेळी सांगितले.