पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोलापुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाचा मृत्यू

कोरोना विषाणू (प्रतिकात्मक छायाचित्र)

आतापर्यंत कोरोना विषाणू मुक्त असलेल्या सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये रविवारी कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याला दुजोरा दिला असून सोलापुरातील हा पहिलाच रुग्ण ठरला आहे. राज्याच्या बहुतांश जिल्ह्यात कोरोना विषाणूचे रुग्ण आढळून आले होते. परंतु, सोलापूर जिल्हा यापासून दूर होता. अखेर येथे पहिला रुग्ण सापडला.

दहावीचा भूगोलचा पेपर रद्द, नववी आणि अकरावीचीही परीक्षा होणार नाही

मृत व्यक्ती हा सोलापूर शहरातील पाच्छा पेठ परिसरातील किराणा दुकानदार असल्याचे समजते. दि.१० एप्रिल रोजी पहाटे या संशयित व्यक्तीला उपचारासाठी सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पीटल) दाखल करण्यात आले होते. दि. ११ एप्रिल रोजी पहाटे त्याचा मृत्यू झाला आहे. त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. या  परिसरातील एक किलोमीटर परिसर सील करण्यात आला आहे.

देशात कोरोनाबाधितांचा आकडा ८३५६ वर, १२७ रुग्णांना डिस्चार्ज