पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक! भुसावळमध्ये भाजप नगरसेवकांसह कुटुंबातील ५ जणांची हत्या

शहापूर हत्या प्रकरण

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहर पाच जणांच्या हत्याकांडाने हादरले आहे. भाजप नगरसेवकाच्या कुटुंबावर घरात घुसून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात भाजप नगरसेवकासह ५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. या हत्याकांड प्रकरणी भुसावळ पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरु आहे. 

आरे वृक्षतोड प्रकरण SC ने घेतले मनावर, उद्या होणार सुनावणी

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील आंबेडकरनगरमध्ये ही घटना घडली आहे. याठिकाणी राहणारे भाजप नगरसेवक रविंद्र खरात उर्फ हंप्या यांच्या कुटुंबावर गोळीबार करण्यात आला आहे. रात्री उशिरा दुचाकीवरुन आलेल्या चार जणांनी रविंद्र खरात यांच्या कुटुंबावर दगड, विटा आणि चाकूने हल्ला केला. या हल्ल्याला खरात कुटुंबियांनी प्रत्युत्तर दिले असता एका आरोपीने त्याच्यासोबत आणलेल्या बंदुकिने खरात कुटुंबावर अंदाधुंद गोळीबार केला. 

कर्नाटकमध्ये विरोधी पक्ष नेतेपदावरुन काँग्रेसमध्ये गटबाजीचा खेळ

दरम्यान, या गोळीबारामध्ये रवींद्र खरात यांच्यासह ५ जण गंभीररित्या जखमी झाले होते. मात्र तीन जणांचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी अवस्थेत रवींद्र खरात आणि आणखी एकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा देखील मृत्यू झाला. तर आणखी एका गंभीर जखमीवर जळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. 

'आरे वाचवा' मोहिमेतील २९ जणांना जामीन

या घटनेमुळे भुसावळ शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरु केला. यापूर्वी देखील हल्लेखोरांनी रविंद्र खरात यांच्या घराव हल्ला केला होता. दरम्यान, तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असल्याचे म्हटले जात आहे. 

बांगलादेश पंतप्रधानांच्या गळाभेटीनंतर प्रियांका म्हणाल्या की, ...