पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भिवंडीत गोदामाला लागलेली आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू

दिल्ली इमारत आग

भिवंडी शहरातील समद नगर भागात असलेल्या मूलचंद कम्पाऊंडमध्ये एका गोदामाला लागलेली आग अद्याप आटोक्यात आलेली नाही. शुक्रवारी रात्री या गोदामाला आग लागली. शनिवारी सकाळीही या ठिकाणी अग्निशामक दलाकडून आग विझविण्याचे काम सुरू आहे. पाच तासांहून अधिक काळ ही आग धुमसत आहे.

मोबाईल चोरट्याला मिळाली मोठी शिक्षा, बोटाचे करावे लागले ऑपरेशन!

मिळालेल्या माहितीनुसार, मूलचंद कम्पाऊंडमधील एका भंगाराच्या गोदामाला आग लागली आहे. हा संपूर्ण परिसर रहिवासी भाग आहे. अनेक जण या भागात राहतात. त्यातच शुक्रवारी रात्री भीषण आग लागल्यामुळे रहिवाशांनी चिंता व्यक्त केली. अग्निशामक दलाच्या तीन ते चार गाड्या या ठिकाणी आग विझविण्याचे प्रयत्न करीत आहेत. 

... हे गोंधळलेल्या मनःस्थितीचे लक्षण, शिवसेनेची राज ठाकरेंवर टीका

आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.