पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भिवंडीमध्ये केमिकल गोदामाला आग; १६ तासानंतरही आगीचे रौद्ररुप कायम

भिवंडी आग

भिवंडीमध्ये केमिकल गोदामाला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. १६ तास उलटूनही आग विझलेली नाही. या आगीने रौद्ररुप धारण केलेले असून अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. भिवंडीतील वळगाव येथील प्रेरणा कंपाऊंडमधील केमिकल गोदामाला मध्यरात्री १ वाजता भीषण आग लागली. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली त्याची अधिकृत माहिती समोर आली नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. या आगीमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

 

'मराठा क्रांती ठोक मोर्चा' विधानसभेच्या सर्व जागा लढवणार

१६ तासानंतर देखील ही आग विझली नाही. आधी केमिकल गोदामाला आग लागली. आग विझविण्यासाठी सर्वप्रथम भिवंडी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीचे रौद्ररुप पाहता ठाणे, कल्याण, उल्हासनगर, एमआयडीसी यांच्या अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. दरम्यान केमिकल गोदामाला लागलेल्या आगीने रौद्ररुप धारण केल्यामुळे शेजारी असणाऱ्या रबरच्या गोदामाला देखील आग लागली. त्यानंतर पहिल्या मजल्यावर असलेल्या बेडशीटच्या गोदामाला देखील आग लागली. त्यामुळे या आगीमध्ये तीन गोदाम जळून खाक झाले आहेत. 

युवीनं लाराला सांगितला गांगुलीच्या 'दादागिरी'चा किस्सा

अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आग विझवण्यासाठी आणखी ६ ते ७ तास लागण्याची शक्यता अग्निशमन दलाच्या जवानांनी वर्तवली आहे. मध्यरात्रीपासून आग लागल्याने केमिकल आणि रबरमुळे परिसरामध्ये धुराचे लोट पसरले आहे. या आगीमुळे लोकांना श्वसनाला त्रास आणि डोळ्यांची जळजळ होत आहे. दरम्यान, घटनास्थळावर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 

खूशखबर!, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांनाही सातवा वेतन