पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मोदींची तुलना शिवरायांसोबत करणाऱ्या लेखकाविरोधात गुन्हा दाखल

जयभगवान गोयल

'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या पुस्तकामध्ये मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांसोबत करण्यात आली आहे. या पुस्तकावरुन राजकारण तापले आहे. त्याचसोबत शिवप्रेमी देखील संतप्त झाले असून आंदोलन करत आहेत. याप्रकरणी पुस्तकाचे लेखक जयभगवान गोयल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोलापुरातील फौजदारी चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 

'पवारांना जाणता राजा, इंदिरा गांधींना दुर्गादेवी म्हणणं योग्य होतं का'

सोलापूरातील शिवसेनेचे कार्यकर्ते दिनकर जगदाळे यांच्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करुन पुस्तक प्रकाशन करून सामाजिक भावना दुखविल्या प्रकरणी जगदाळे यांनी तक्रार दाखल केली होती. सोलापुरातील फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गोयल यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवरायांच्या नखाचीही सर मोदींना येणार नाही: बाळासाहेब थोरात

दिनकर जगदाळे यांनी तक्रारीमध्ये असे म्हटले आहे की, 'आज के शिवाजी-नरेंद्र मोदी' या पुस्तकामध्ये शिवरायांचा उल्लेख एकेरी शब्दा केले असल्याचे निदर्शनास आले आहे. मोदींची तुलना शिवरायांसोबत केली आहे. त्यामुळे देशातील तमाम शिवप्रमी आणि शिवभक्तांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे देशात आणि महाराष्ट्रात अशा पुस्तकामुळे मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. शिवरांयाबद्दल असा एकेरी शब्द वापरुन त्यांचा अवमान केला आहे.'

शिवाजी महाराजांच्या वंशजांनी राजीनामे द्यावेतः संजय राऊत

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:fir registered in solapur against jai bhagwan goayal a wtriter of aaj ke shivaji narendra modi book