पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शेतकरी आत्महत्याप्रकरणी खासदार ओमराजे राजेनिंबाळकरांवर गुन्हा

खासदार ओमराजे निंबाळकर आणि आत्महत्या केलेले शेतकरी दिलीप ढवळे

कट कारस्थान करून शेतकर्‍याची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी उस्मानाबादचे शिवसेना खासदार ओम राजेनिंबाळकर यांना जबाबदार धरण्यात आले आहे. ओम राजेनिंबाळकर यांच्यासह ५२ जणांवर फसवणूक व शेतकर्‍यास आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शेतकरी दिलीप ढवळे यांनी आत्महत्येपूर्वी खासदार राजेनिंबाळकर यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावे चिठ्ठी लिहून गळफास घेतला होता.

काम केल्यामुळंच भाजपला मतदान, ईव्हीएमवरुन उदयनराजेंचं घुमजाव
 
ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी दि. १२ एप्रिल रोजी उस्मानाबाद तालुक्यातील कसबे तडवळे येथील शेतकरी दिलीप शंकर ढवळे यांनी गळफास घेवून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी आर्थिक फसवणूक केल्यामुळे आपल्याला मानहानी सहन करावी लागली. त्यातून जमिनीवर जप्ती आली. या सर्व त्रासाला कंटाळून आपण आत्महत्या करीत असल्याचे चिठ्ठीत नमूद केले होते. सविस्तर पुरावे घरी कपाटातील पिशवीत पाहायला मिळतील, असेही आत्महत्त्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद करण्यात आले होते. 

बारामतीः मुख्यमंत्र्यासमोर राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा राडा, पोलिसांचा लाठीमार

पोलिसांनी घटनास्थळावरून मिळालेल्या सर्व गोष्टी साक्षीदारांसमक्ष ताब्यात घेवून कुटूंबीयांचा जबाब नोंदवून घेतला आणि मयत शेतकर्‍याने लिहिलेली चिठ्ठी हस्ताक्षर तज्ज्ञांकडे तपासणीसाठी पाठविली होती. त्याचा सकारात्मक अहवाल प्राप्त झाल्यानंतर खासदार राजेनिंबाळकर, वसंतदादा बँकेचे अध्यक्ष विजय दंडनाईक, तेरणा कारखान्याच्या अध्यक्षा आनंदीदेवी राजेनिंबाळकर, कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक अशा एकूण ५२ जणांविरोधात ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

तेरणा कारखान्याने कर्जापोटी ढवळे यांची जमीन वसंतदादा बँकेकडे गहाण ठेवली होती. कारखान्याने कर्ज न भरल्यामुळे ढवळे यांची जमीन लिलावात निघाली होती. या तणावामुळे त्यांनी चिठ्ठी लिहून आत्महत्या केली होती.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:fir file against osmanabad shiv sena mp omraje nimbalkar for provocation farmer to suicide