पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लॉकडाऊन काळात विठ्ठल-रुक्मिणीची महापूजा करणाऱ्या भाजप आमदाराविरोधात गुन्हा

लॉकडाऊन काळात भाजप आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी विठ्ठल-रक्मिणीची महापूजा केली

लॉकडाऊन काळात मंदिरे भाविकांना दर्शनासाठी बंद असतानाही पंढरपुरातील विठ्ठल-रक्मिणी मंदिरात जाऊन महापूजा करणारे भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि इतर दोघांवर राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने सुजितसिंह ठाकूर यांच्याविरोधात पंढरपूर शहर पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

'हनुमानासारखा पर्वत उचलायचा नाही, घरी थांबूनच जयंती साजरी करा'

श्री विठुरायाच्या पंढरीत भरणाऱ्या चार प्रमुख वाऱ्यांपैकी असलेली चैत्री एकादशी ४०० वर्षांच्या इतिहासात कोरोनाच्या जीवघेण्या संकटामुळे भाविकाविना पार पडली. सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून धुरा हाती घेतलेले गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही संत चोखोबांच्या समाधीचे दर्शन घेऊन मुंबई गाठली होती. परंतु, मंदिर समितीचे सदस्य तथा भाजपचे आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी सपत्निक महापूजा केली होती. यावेळी आमदार ठाकूर यांच्यासह शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संभाजी शिंदे आणि त्यांच्या पत्नवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

लॉकडाऊनः एमपीएससीची परीक्षा पुन्हा स्थगित

चैत्री एकादशीनिमित्त शनिवारी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तथा मंदिर समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी आणि मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सपत्निक महापूजा केली. या पूजेनंतर अनेकांनी विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतल्याची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसने केली होती. 

लॉकडाऊन : इरफानचा मुस्लिम बांधवांना खास संदेश Video

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संदीप मांडवे, सुभाष भोसले, श्रीकांत शिंदे यांनी पंढरपूर शहर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. शेजाऱ्याच्या उस्मानाबाद शहरातून कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. आमदार ठाकूर हे त्याच भागातून येतात. हा प्रकार अशोभनीय आहे, अशी प्रतिक्रिया संदीप मांडवे यांनी दिली होती.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:fir file against bjp mla sujitsingh thakur for vitthal rukhmini mahapuja in lockdown period coronavirus breakdown