पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'औरंगाबाद' पुसून 'संभाजीनगर' करण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून कारवाईचे आश्वासन

औरंगाबाद रेल्वे स्थानक (एएनआय)

औरंगाबाद रेल्वे स्थानकावरील नावाच्या पाटीवर पिवळा रंग टाकून औरंगाबाद हे नाव पुसण्याचा आणि त्या ठिकाणी संभाजीनगर लिहिण्याचा प्रकार घडला. याचा व्हिडिओ सोशल मीडियात प्रसारित झाल्यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेतली आहे. संबंधितांना लवकरच अटक केली जाईल, असे औरंगाबादमधील पोलिसांनी म्हटले आहे.

औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याची मागणी शिवसेनेने खूप वर्षांपूर्वी केली आहे. शिवसैनिकांकडून या शहराचा उल्लेख संभाजीनगर असाच केला जातो. औरंगाबाद शहरातील रेल्वे स्थानकावर मोठ्या फलकावर शहराचे नाव लिहिण्यात आले आहे. याच फलकावर काही जणांनी पिवळा रंग टाकून औरंगाबाद नाव पुसण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर तिथे मोठ्या अक्षरात संभाजीनगर असे लिहिण्यात आले.

याचा व्हिडिओ औरंगाबादमध्ये सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात फिरला. यानंतर पोलिसांनी त्याची दखल घेतली आणि हे कृत्य करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. संबंधितांना लवकरच अटक केली जाईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. एएनआयने या संदर्भातील ट्विट केले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:few men removing the name Aurangabad and writing Sambhaji Nagar Police say They will be arrested soon