पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'चौकशीचा ससेमिरा, कारखान्यांची थकित ऊसबिले यामुळे नेत्यांचे पक्षांतर'

अजित पवार

काहींची चौकशी सुरू आहे, कोणाच्या कारखान्यांची ऊसबिले थकीत आहेत तर काही जणांचे वय झाले आहे. त्यामुळे तिकीट मिळणार का, असा प्रश्न असल्याने इतर पक्षात ते चाचपणी करीत आहेत. सत्ताधारी पक्षात गेल्याने अधिकारीही कारवाई करीत नाहीत. त्याचाही फायदा होतो. पण हे लोक गेले तरी त्याचा पक्षावर परिणाम होत नसतो. थोडे वाईट वाटते. पण पक्ष वाढविण्याचे काम कार्यकर्ते करीतच असतात, त्यांच्या ताकदीवर पक्ष वाढत असतो, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. सोलापूर येथे ते बोलत होते.

खासगी नोकरीत स्थानिकांना ७५ टक्के आरक्षण देणारः अजित पवार
पवार म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या सुप्त लाटेमुळे सर्वांना दारूण पराभवास समोरे जावे लागले. महाराष्ट्रात वंचितच्या उमेदवारांचा मोठा फटका आघाडीच्या उमेदवारास बसला. याची दुरुस्ती विधानसभा निवडणुकीत करण्यात येणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही १७५ जागांचे उद्दिष्ट ठेवले आहे. वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा सुरू असून, समंजसपणाने मार्ग काढू. तरुण व महिलांमध्ये विद्यमान सरकारबद्दल प्रचंड नाराजी आहे. त्याचा लाभ उठवण्याचा आमचा प्रयत्न आहे.'

निवडणुकांसाठी आम्हाला यात्रा काढायची गरज नाही, प्रकाश आंबेडकरांचा टोला

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:fear of inquiry and pending sugar cane bill leaders changes political party says ncp leader ajit pawar