पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

फलटणमध्ये दारूड्या मुलाचा पित्यानेच केला खून

हत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

दारूच्या नशेत दररोज आई, पत्नीला मारहाण करणाऱ्या मुलाची जन्मदात्या पित्यानेच हत्या केल्याची धक्कादायक घटना फलटण (जि. सातारा) तालुक्यातील गुणवरे गावात घडली. मुलगा सुभाष (३८) गाढ झोपेत असताना मध्यरात्री मुलाच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार करून वडिलांनी त्याला ठार मारले. या प्रकरणी मुलाचा पिता लक्ष्मण बाळू नाळे याला पोलिसांनी अटक केली आहे.

अडाणी डॉक्टरच्या हातात अर्थव्यवस्था, चिदंबरम यांची टीका

सुभाष हा दारुच्या आहारी गेला होता. दारू पिऊन कुटंबीयांना त्रास देत असत. आई, वडील, पत्नी यांना रोजच तो मारहाण करीत होता. अखेर शनिवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास वडील लक्ष्मण नाळे यांनी सुभाष झोपेत असताना कुऱ्हाडीने घाव घातले. या घटनेची माहिती सुभाषचे काका शंकर बाळू नाळे यांनी फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनला दिली. या घटनेची खबर मिळताच उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिसांच्या पथकाने घटनास्थळास भेट दिली.

चीनकडून मोदींची प्रशंसा, 'कोरोनो'शी लढण्यासाठी दाखवली मदतीची तयारी