पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुलीने प्रेमविवाह केल्याने वडिलांची आत्महत्या

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

भादली (जि. जळगाव) येथील मुलीने प्रेमविवाह केल्याने मानसिक तणावात असलेल्या वडिलांनी नशिराबाद-भादली रुळावर रेल्वेसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. नरेंद्र मुरलीधर नारखेडे (५२ रा. नारखेडेवाडा, भादली) असे मृताचे नाव आहे. 

नारखेडे यांच्या मुलीने तपत कठोरा येथील तरुणाशी प्रेमविवाह केला आहे. मुलीने आपल्या मनाविरुध्द मुलाशी प्रेमविवाह केल्याने ते व्यथीत झाले होते. या प्रकाराने मानसिक तणावात असलेले नारखेडे गुरुवारी रात्री ८.३० वाजता घराबाहेर पडले. बऱ्याच वेळानंतरही ते घरी परतले नाहीत. त्यामुळे त्यांच्या पत्नीने भाच्याला याबाबत सांगितले. त्यांचा भाचा कपिल पाटील यांनी नारखेडे यांचा शोध घ्यायला सुरुवात केली. 

पंढरपुरात फेसबुक लाइव्ह करत पत्रकाराचा आत्महत्येचा प्रयत्न

कपिलला रात्री ११ वाजेच्या सुमारास नशिराबाद-भादली गेटजवळ मृतदेह आढळून आला. तो मृतदेह नारखेडे यांचा असल्याचे त्याने ओळखले. नारखेडे इलेक्ट्रिशियनचे काम करत होते. पुढील तपास पोलिस करत आहेत.