पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याच्या पत्नीने गळफास घेऊन संपवले आयुष्य

किशोर वसंत साळुंके यांच्या पत्नी मीनाक्षी गळफास घेऊन आपले आयुष्य संपवले

उस्मानाबाद तालुक्यातील मेडसिंगा येथील शेतकरी किशोर वसंत साळुंके यांच्या पत्नी मीनाक्षी किशोर साळुंके यांनी कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. 

धक्कादायक! नागपूरमध्ये ५ वर्षांच्या मुलीची दगडाने ठेचून हत्या

मागील पंधरा दिवसातील मेडसिंगा येथील कर्जबाजारी व नापिकीला कंटाळून दुसरी आत्महत्या आहे. आत्महत्या केलेल्या महिलेचे पती किशोर साळुंखे यांनी मागील दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीयकृत बँक ऑफ महाराष्ट्र आणि महात्मा बसवेश्वर आणि डॉ. पद्मसिंह पाटील सहकारी पतसंस्था या दोन खासगी संस्थेमधून कर्ज उचलले होते. पण दुष्काळ आणि पीक काढणीच्या वेळी पडलेला अवकाळी पाऊस यामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. 

हैदराबाद एन्काऊंटर: हुज्जत घालणाऱ्या महिला पत्रकाराला सायनाने सुनावले

शेतीतून वर्षाकाठी मिळणारे उत्पन्न बुडाल्यामुळे कर्ज कसे फेडावे हा प्रश्न त्यांच्यासमोर आवासून बसला होता. त्याच तणावाखाली येऊन साळुंके यांची पत्नी मीनाक्षी याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात पती, लहान दोन मुले, वृद्ध सासू-सासरे असा परिवार आहे. प्रशासनाने मेडसिंगा गावामध्ये समाज प्रबोधन करावे अशी गावकऱ्यामधून मागणी होत आहे.