पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मुलाने कविता केली..दोन तासांनंतर शेतकरी पित्याची आत्महत्या

मृत मल्हारी बटुळे

अहमदनगर जिल्ह्यातील भारजवाडी गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. एका शेतकऱ्याने नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. मल्हारी बटुळे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. मल्हारी बटुळे यांच्या इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या मुलाने मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने शाळेत आयोजित कार्यक्रमात ''शेतकरी मायबापा आत्महत्या करू नको रे'' ही कविता सादर केली होती. कविता सादर केल्यानंतर काही वेळातच मल्हारी यांनी विषप्राशन करुन आत्महत्या केली. घरातील एकमेव कर्त्या पुरुषाने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. 

शेतकऱ्यांना दिलासा; कर्जमाफीची दुसरी यादी जाहीर

पाथर्डी तालुक्यातील भारजवाडी येथील मल्हारी बटुळे यांनी ट्रॅक्टर आणि शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेतले होत. मात्र काही महिन्यांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीमध्ये पीक उद्धवस्थ झाले. बँकेचे कर्ज कसे फेडायचे या विंवचनेत असलेल्या मल्हारी यांनी आत्महत्या केली. आत्महत्येच्या दोन तास आधी मल्हारी यांच्या तिसरीत शिकणाऱ्या प्रशांतने शाळेत कविता सादर केली होती. 

मराठा आरक्षण सुनावणीचा मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला