पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

नगरमध्ये ट्रॅक्टर विहिरीत कोसळून झालेल्या अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू

ट्रॅक्टर विहीरीत कोसळून झालेल्या अपघातात शेतकऱ्याचा मृत्यू

कर्जत शहरालगत असलेल्या जामदारवाडा येथे मोहनराव लाढाणे या शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये टॅक्टरसह पडून कानिफनाथ रामदास बळे वय २२ वर्षे या तरुण  शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. कर्जत पोलिसांत या प्रकरणातील गुन्हा दाखल करण्यात आला असून अपघात नेमका कसा झाला? याचा पोलिस तपास करत आहेत.  

अजित पवार यांच्या स्वीय सहाय्यकाच्या भावाची निर्घृण हत्या

कर्जत तालुक्यातील संतोष अंकूश घालमे नावाचा इसम हा जमदारवाडा येथे त्यांचे सासरे शिवाजी हरीभाऊ काळे यांचे घरी कामा निमित्त आला होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास शिवाजी हरीभाऊ काळे यांनी घरी पळत येत ट्रॅक्टरसह तरुण विहिरीमध्ये कोसळून अपघात झाल्याची माहिती  सांगितली. त्यानंतर परिसरात एकच खळबळ माजली. विहिरीमध्ये पाणी असल्यामुळे ट्रॅक्टर किंवा तरुण यात दिसत नव्हते. 

'अखेरच्या श्वासापर्यंत उपलब्ध कायदेशीर पर्याय वापरण्याचा अधिकार'

पण विहिरीच्या पाण्यावर डिझेलचा तवंग आणि काठावर ट्रॅक्टर पडल्याच्या खूणा  दिसून आल्या. त्यानंतर मोटारीच्या साहयाने विहिरीतील पाणी बाहेर काढल्यानंतर क्रेनच्या मदतीने कानिफनाथ रामदास बळे याचा मृतदेह आणि ट्रॅक्टर विहिरीबाहेर काढण्यात आला. संतोष अंकूश घालमे यांनी याची माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच घटनास्थळी दाखल होत पोलिसांनी पंचनामा केला.