पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

चंद्रपूरात अवकाळी पाऊस; वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

चंद्रपूरात शेतकऱ्याचा मृत्यू

चंद्रपूरमध्ये अंगावर वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. पोंभूर्णा तालुक्यातील चिंतलधाबा गावात ही घटना घडली आहे. रामन्नी देवलोहट (५५ वर्ष) असं मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. शेतातून परत येत असताना त्यांच्या अंगावर वीज पडली आणि जागीच त्यांचा मृत्यू झाला. सकाळी ६ वाजता ही घटना घडली आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत; आंबिवलीजवळ डंपरची रेल्वेगेटला धडक 

चंद्रपूर जिल्ह्यात मध्यरात्रीपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेल्या रब्बी पिकांचे मोठे नुकसान होण्याची मोठी शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून चंद्रपूरात ढगाळ वातावरण होते. आता थंडीच्या दिवसात पाऊस पडत असल्यामुळे पिकांवर मोठं संकट आले आहे. 

बगदाद विमानतळावर अमेरिकेकडून रॉकेट हल्ला; ८ जण ठार

मध्यरात्रीपासून जिल्ह्यातल्या काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे कोरडे नाले वाहू लागले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील हरभरा, कापूस, गहू, मूग, तूर  या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पावसामुळे शेतकऱ्याच्या हाती आलेल्या पिकांचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आला आहे. 

राहुल गांधी अन् प्रियांका गांधी यांना अमित शहांनी दिले चॅलेंज