पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोलापुरात कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

आत्महत्या (प्रतिकात्मक छायाचित्र)

नापिकी आणि कर्जाला कंटाळून येणकी (ता. मोहोळ, जि. सोलापूर) येथील तुकाराम निवृत्ती माने (वय ५५) या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. 

दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला दिलासा, केंद्राकडून २१६० कोटींचा मदतनिधी

तुकाराम माने यांना अत्यवस्थ अवस्थेत सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. परंतु, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. तुकाराम माने यांची आठ एकर शेती आहे. त्यांची दोन एकर डाळिंब बाग आहे. त्यासाठी अडीच लाख रुपये खर्च आला होता. पाण्याअभावी बाग पूर्णपणे वाळून गेली. फक्त वीस हजार रुपये उत्पन्न मिळाले. दोन एकर ऊसही वाळून गेला. त्यातच मागील दोन महिन्यांपासून बोअरला पाणी कमी झाले होते. मोहोळ येथील एका बँकेकडून त्यांनी दहा लाखांचे कर्ज घेतले होते. या आर्थिक विवंचनेमुळे ते तणावात होते. त्यातून त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती त्यांचा मुलगा शिवशंकर माने यांनी दिली.  

धक्कादायक!, देशात यंदा मान्सून पूर्व पावसात २९ टक्के घट

सिव्हिल पोलिस चौकीत या घटनेची प्राथमिक नोंद घेण्यात आली आहे. सोलापूर तालुका पोलिसांनी प्राथमिक जबाब घेऊन हा गुन्हा मोहोळ पोलिसांकडे वर्ग केला आहे.