पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रसिध्द मंदिरं बंद

पंढरपूर

झपाट्याने वाढणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व प्रसिध्द मंदिर प्रशासनाने मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भाव वाढत चालल्यामुळे भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तसंच, सरकारच्या आदेशानंतर राज्यातील सर्व जत्रा, यात्रा, उत्सव रद्द करण्यात आले आहेत. त्याचसोबत प्रसिध्द पर्यटन स्थळं देखील बंद करण्यात आली आहेत. 

कोरोना विषाणू: केंद्रीय राज्यमंत्री व्ही मुरलीधरन विलगीकरण कक्षात

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शनी शिंगणापूर मंदिर, सप्तश्रृंगी मंदिर, शिर्डी येथील साईबाबा मंदिर, शेगावचे गजानन महाराजांचे मंदिर, रत्नागिरीचे गणपती पुळे मंदिर, तुळजापूरचे तुळजाभवानी देवीचे मंदिर, कोल्हापूरचे अंबाबाई मंदिर, कोल्हापूरचे ज्योतिबा मंदिर, जेजूरीचे खंडोबा मंदिर, पंढरपूरचे विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, परळीचे वैद्यनाथ मंदिर, देहू येथील संत तुकाराम मंदिर बंद करण्यात आले आहे. तसंच मुंबईतील प्रसिध्द सिध्दीविनायक मंदिर, मुंबा देवी मंदिर देखील बंद करण्यात आले आहे. पुढील आदेश मिळेपर्यंत ही मंदिरं भाविकांसाठी बंद राहणार आहे. 

भारतातील पहिल्या महिला मरिन पायलट कोरोना संशयित

राज्यातील या प्रसिध्द मंदिरांमध्ये देश-विदेशातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. कोरोनाचा संसर्ग होऊ नये आणि गर्दी टाळण्यासाठी देवस्थान प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही मंदिर प्रशासनाकडून भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.  सध्या राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ३९ वर पोहचली आहे. तर मुंबईमध्ये मंगळवारी कोरोनामुळे पहिला बळी गेला आहे. देशामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन आकडा १२५ झाला आहे. 

कोरोना विषाणूमुळे राज्यातील सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित