पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बनावट सोने देऊन ५ लाखांची फसवणूक

सोनं स्वस्त तर चांदी महागली

स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून बनावट सोने देत मंगळवेढा (जि. सोलापूर) तालुक्यातील ढवळस येथील एकाची ५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी उस्मानाबाद जिल्ह्यातील चार जणांविरुद्ध गुन्हा आंबी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

..म्हणून अजित पवारांनी मागितली माफी

ढवळस येथील संतोष सौदागर मोरे यांना रवींद्र गोडबोल्या काळे, निवांत्या गिरक्या शिंदे, लाडकी निवांत्या शिंदे, गोडबोल्या अधिक्या काळे व अन्य एक व्यक्ती (सर्व रा. साकत (खुर्द), ता.परंडा) यांनी रवींद्र काळे यांच्या घरी बोलावले आणि “तुम्हाला स्वस्तात सोने देतो”, असे सांगितले.

मी पुन्हा येईन म्हणणारे देवेंद्र फडणवीसांची नवी ओळख महाराष्ट्राचा

त्यानंतर दि. २५ ऑक्टोबर रोजी  संतोष मोरे यांनी रवींद्र काळे यांच्या घरी जाउन ५ लाख रुपये देऊन सोने ताब्यात घेतले. परंतु, ते सोने नकली असल्याचे नंतर समजून आले. अशा प्रकारे आरोपींनी संगनमताने संतोष मोरे यांची फसवणूक केली. याप्रकरणी त्यांच्या फिर्यादीवरुन संशयित आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

व्होडाफोनकडून निर्वाणीचा इशारा; CEOने सरकारकडे मागितली