पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कोर्टाचे समन्स

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागपूरच्या स्थानिक कोर्टाने समन्स बजावले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेदवारी अर्ज दाखल करताना  त्यांच्यावरील दोन गुन्हेगारी खटल्यांची माहिती लपवल्याबाबत त्यांना कोर्टाने समन्स बजावले आहेत. नागपूरमधील फडणवीस यांच्या घरी पोलिसांनी समन्स पोहोचवले आहेत. 

देवेंद्र फडणवीस यांचा नव्या घरासाठी शोध सुरु

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या शपथविधी सोहळ्याच्या दिवशीच कोर्टानं देवेंद्र फडणवीस यांना समन्स बजावले.  फडणवीस यांच्याविरोधात १९९६ आणि १९९८ मध्ये मानहानी, फसवणूकचे गुन्हे दाखल झाले होते मात्र दोन्ही आरोपांची निश्चिती झाली नव्हती. नागपूरमधील वकील सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात याचिका दाखल केली होती.  उमेदवारी अर्ज भरताना दाखल करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात फडणवीस यांनी माहिती लपवली  त्यामुळे फडणवीस यांच्याविरोधात गुन्हेगारी खटला चालवण्याची उके यांची मागणी होती.

मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वर भीषण अपघात, चार ठार

मुंबई  उच्च न्यायालयानं उके यांची याचिका फेटाळून लावली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानं १ ऑक्टोबर रोजी तक्रारीवर नव्याने सुनावणी घेण्यास मंजुरी दिली. दंडाधिकारी न्यायालयाने ४ नोव्हेंबर रोजी हा खटला सारांश फौजदारी खटला म्हणून ठेवला जाईल असे सांगत फडणवीस यांना नोटीस बजावली. 

हे नातं असंच राहू दे, फडणवीसांचे राऊतांनी मानले आभार