पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'ठाकरे सरकार मुंबई नव्हे दिल्लीतील 'मातोश्री'च्या आदेशावर चालेल'

देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे

माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाआघाडी सरकारवर तोफ डागताना शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे. तीन पक्षाच्या माध्यमातून स्थापन झालेल्या  ठाकरे सरकारची दोर दिल्लीच्या मातोत्रीच्या हातात आहे, असा टोला फडणवीसांनी लगावला आहे. जिल्हापरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालघरमधील रॅलीला संबोधित करताना त्यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले. 
फडणवीस म्हणाले की, हे सरकार मुंबईतील मातोश्रीवरुन नाही तर दिल्लीच्या मातोश्रीवरुन नियंत्रित केले जाईल. फडणवीसांनी कोणाचे नाव घेतले नसले तरी काँग्रेसच्या इशाऱ्यांवर शिवसेनेला निर्णय बदलावे लागतील, असे फडणवीसांनी सूचित केले आहे.  

'जनतेने सरकारचा राजकीय सातबारा कोरा करुन घरी पाठवले पाहिजे'

दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब यांना शब्द दिल्याचे सांगत राष्ट्रवादी-काँग्रेससोबत जाणाऱ्या उद्धव ठाकरेंचा निर्णय बाळासाहेबांनाही मान्य झाला नसता, असा उल्लेखही फडणवीसांनी यावेळी केला. जनादेशाचा अपमान करुन शिवसेनेने महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास घात केल्याचा आरोपही फडणवीसांनी पुन्हा एकदा सेनेवर केला.  राज्यातील विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना यांना महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. मात्र निकालानंतर शिवसेना मुख्यमंत्रिपदावर अडून बसली. मुख्यमंत्रिपदाच्या मुद्यावरुन युतीमध्ये बिनसले.

मराठी साहित्य संमेलनाची उस्मानाबादेत जय्यत तयारी

निकालाच्या पहिल्या दिवसांपासून पर्याय खुले असल्याची भाषा करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या साथीने राज्यात सरकार स्थापन केले. उद्धव ठाकरे हे ठाकरे घराण्यातील पहिले मुख्यमंत्रीही झाले. सरकार स्थापनेसाठी काँग्रेसमुळे विलंब होत असल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्तारानंतर खातेवाटपाच्या मुद्यावर तिन्ही पक्षात मतभेद असल्याची चर्चा सुरु आहे. विधानसभा निवडणुकीत कुठेच न दिसलेली काँग्रस महाविकास आघाडी सरकारमध्ये काही विशिष्ट खाती मिळावित यासाठी आग्रही असल्याचे बोलले जात होते.