पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

भ्रष्टाचार बाहेर काढण्याच्या वल्गना करु नका, फडणवीसांचे चव्हाणांना प्रत्युत्तर

पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस

आमच्या काळात काही घडले असेल तर त्याची जरुर चौकशी करा. आमचा कारभार पारदर्शक होता. त्यामुळे अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. उगाच भ्रष्टाचार बाहेर काढण्याच्या वल्गना करु नये, असे प्रत्युत्तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना दिले आहे. ते पंढरपूर येथे बोलत होते.

सोलापूरः मोहिते-पाटील कुटुंबातील दोघांसह सहा सदस्यांचे राष्ट्रवादीतून निलंबन

पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यातील महाआघाडी सरकार पूर्वीच्या फडणवीस सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढणार असल्याचा इशारा दिला होता. आतापर्यंतचे सर्वांत भ्रष्ट सरकार फडणवीसांच्या काळात होते, असा आरोप चव्हाण यांनी केला होता. फडणवीस सरकारचे एक-एक प्रकरणे बाहेर काढणार आहोत. त्यांनी राजेरोसपणे भ्रष्टाचार केला होता. आम्ही त्यांची प्रकरणे बाहेर काढणार असल्याचे चव्हाण म्हणाले होते. 

लातूरचा पाणी प्रश्न प्राधान्याने सोडवण्याचा मुख्यमंत्र्यांचा शब्द

यावर फडणवीस म्हणाले की, चव्हाणांनी भ्रष्टाचार बाहेर काढण्याच्या गोष्टी बोलू नयेत. आम्ही पारदर्शक कारभार केला होता. अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. त्यांना शंका असेल तर त्यांनी १०० टक्के चौकशी करावी. असल्या पोकळ धमक्या देऊ नका. फडणवीस सरकारचा कारभार संपूर्ण जनतेने पाहिला आहे. आकसबुद्धीने सरकार काम करत आहे. हे सरकार राज्यात राजकारणाची नवा पायंडा पाडत आहे, असेही ते म्हणाले. 

प्राथमिक शिक्षण केवळ मातृभाषेतच हवेः उपराष्ट्रपती नायडू