पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शेततळ्यात बुडून विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू

नाल्यात पडून मुलाचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यामध्ये शेततळ्यात बुडून विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना बेल्हे येथे घडली आहे. श्याम घोडके असं या विद्यार्थ्याचे नाव आहे. तो अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत होता. या घटनेमुळे बेल्हे येथे शोककळा पसरली आहे. 

कलम ३७० रद्द ! विधेयक राज्यसभेत १२५-६१ मतांनी मंजूर

श्याम घोडके आज दुपारच्या सुमारास बांगरवाडी येथील शेत तळ्यावर गेला होता. हॉस्टेलवरील काही मित्रांसोबत तो पोहायला गेला होता. मात्र श्यामला पोहता येत नसल्याने तो शेततळ्याच्या कडेला बसला होता. मात्र अचानक पाय घसरून तो शेततळ्यात पडला. पोहता येत नसल्याने शेततळ्यात बुडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी जुन्नर पोलिसांनी घटनेची नोंद करुन घेतली आहे. 

पुण्यातील शाळा, महाविद्यालयांना मंगळवारी सुटी जाहीर

गेल्या काही दिवसांपासून पुणे जिह्यातल्यासह जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसाची बॅटिंग सुरुच आहे. या पावसामुळे नदी, नाले भरुन वाहत आहेत. अशातच आज पावसाने काहिशी विश्रांती घेतल्यामुळे श्याम घोडके मित्रांसोबत पोहण्यासाठी गेला असता ही घटना घडली आहे. 

जम्मू-काश्मीर होणार केंद्रशासित प्रदेश; कसे बदलणार अधिकार