पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तीन नगर परिषदा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, १० जानेवारीला मतमोजणी

यू पी एस मदान

कन्हान- पिंपरी (जि. नागपूर) व गडचांदूर (जि. चंद्रपूर) नगरपरिषद आणि लांजा (जि. रत्नागिरी) नगरपंचायतीच्या सार्वत्रिक तर इतर विविध नगरपरिषदा, नगरपंचायतींमधील सहा रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी ९ जानेवारी २०२० रोजी मतदान होणार आहे. मतमोजणी १० जानेवारीला होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिली.

'नागरिकत्व विधेयकाला विरोध करणारे पक्ष पाकिस्तानचीच भाषा बोलताहेत'

मदान यांनी सांगितले की, या सर्व संबंधित ठिकाणी मंगळवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे. नामनिर्देशनपत्रे १६ ते २० डिसेंबर २०१९ या कालावधीत सादर करता येतील. त्यांची छाननी २१ डिसेंबर २०१९ रोजी होईल. अपील नसलेल्या ठिकाणी २७ डिसेंबर २०१९ पर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येतील. अपील असलेल्या ठिकाणी अपिलाच्या निर्णयानंतर तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्र मागे घेता येतील. मतदान ९ जानेवारी रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत होईल. मतमोजणी १० जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता सुरू होईल.

निर्भया प्रकरण: मेरठमधील पवन जल्लाद दोषींना फाशी देणार

रिक्तपदांसाठी पोटनिवडणुका होणाऱ्या जागांचा नगरपरिषद, नगर पंचायत निहाय तपशील: तळेगाव दाभाडे (जि. पुणे)- 7ब, देवळा (नाशिक)- 11, भुसावळ (जळगाव)- 24अ, नेवासा (अहमदनगर)- 13, नांदुरा (बुलढाणा)- 7ब आणि कळमेश्वर ब्राम्हणी (नागपूर)- हद्दवाढ क्षेत्रासाठी.