पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मनसेच्या झेंड्यावरील राजमुद्रेसंदर्भातील तक्रारीची EC कडून दखल

महाराष्ट्र नव निर्माण सेनेचा नवा ध्वज

मनसेच्या नव्या झेंड्यावरील राजमुद्रे संदर्भातील दाखल तक्रारीची राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतली आहे. मनसेच्या नव्या भगव्या रंगाच्या झेंड्यावर राजमुद्रा आहे. यासंदर्भात संभाजी ब्रिगेडसह अन्य काही संघटनांनी आक्षेप घेतला होता. याच पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मनसेला नोटीस पाठवली असून पक्षपातळीवर यावर तोडगा काढण्याची सूचना देण्यात आल्याचे वृत्त आहे. मनसे यावर काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.     

मनसे झेंडा वाद: संभाजी ब्रिगेडकडून राज ठाकरेंविरोधात तक्रार दाखल

 महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाअधिवेशनात पक्षाने नवा रंग आणि नवा ध्वज हातात घेत नव्याने आपला प्रवास सुरु केला आहे. मात्र राजमुद्रा ही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रशासकीय मुद्रा असून याच राजमुद्रेचा वापर करुन शिवरायांनी रयतेचे राज्य निर्माण केले आहे. राजमुद्रेचा वापर कोणत्याही राजकीय पक्षाने करणे हे चुकीचे आहे, अशी भूमिका संभाजी ब्रिगेड या संघटनेने घेतली होती. 

राज ठाकरेंनी सांगितले झेंडा बदलण्याचे कारण...

याशिवाय अन्य काही संघटनांनी देखील मनसेच्या नव्या झेंड्यावर आक्षेप घेतला होता. यांसदर्भात राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रारीही दाखल करण्यात आल्या होत्या. राज ठाकरे यांनी महाअधिवेशनातील आपल्या भाषणात पक्षाचे दोन झेंडे असतील, असे स्पष्ट केले होते. प्रचारावेळी कोणीही राजमुद्रा असणारा झेंडा वापरायचा नाही, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले होते. महाअधिवेशनानंतर राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली मुंबई निघालेल्या महामोर्चात राजमुद्रा असणारा भगवा झेंडा घेऊन मनसे कार्यकर्ते मोर्चात सामील झाल्याचे पाहायला मिळाले होते. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Election Commission issues notice to MNS chief Raj Thackeray on New Flag Rajmudra controversy