पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

..तर मला वेगळा विचार करावा लागेल, नाराज खडसेंचा पक्षश्रेष्ठींना इशारा

भाजपचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे

भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा आपली नाराजी व्यक्त केली आहे. गेली ४० वर्षे पक्षासाठी हमाली केली. पक्षानेही मला भरपूर दिले. पण अवघ्या चार दिवसांत माझी बदनामी केली गेली. मी काहीही केलेले नसताना माझ्यावर कारवाई करण्यात आली. खडसे कुठल्यातरी स्पर्धेत येईल त्यासाठीच माझी बदनामी करण्यात आली. मला आता निर्णय प्रक्रियेतूनही काढून टाकण्यात आले आहे. मला कोअर कमिटीतही स्थान नाही. आजही मला फक्त जळगावच्या बैठकीचे निमंत्रण होते. हा माझा अपमान आहे. मला टार्गेट केले जात असल्याची कार्यकर्त्यांची भावना आहे. शेवटी मी माणूस आहे, देव नाही. मलाही भावना आहेत. जर असाच माझ्यावर अन्याय होत राहिला तर मला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा एकनाथ खडसे यांनी भाजपच्या पक्षश्रेष्ठींना दिला. 

जगात भारताची ओळख 'रेप कॅपिटल' अशी झालीय : राहुल गांधी

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले की, मुलीच्या पराभवाबाबत चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा झाली. त्यांना सर्व पुरावे दिले आहेत. पराभव करण्यात ज्यांचा हात होता, त्यांची नावे मी प्रसारमाध्यमांसमोर सांगू का अशी परवानगी मागितली. परंतु, पाटील यांनी असे करणे पक्षशिस्तीचा भंग ठरेल. त्यांनी पक्षाचे अध्यक्ष अमित शहा आणि जे पी नड्डा यांच्यासमोर याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन दिले आहे. 

हैदराबाद एनकाऊंटरविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका

ओबीसींवर अन्याय होतो, असे मी कधीच म्हटले नाही. कार्यकर्त्यांचे असे म्हणणे आहे, याबाबत मी सांगितले. सर्वांच्या भावना पोहोचवण्याचे काम मी केले. माझ्यावर अन्याय झाला. गोपीनाथ मुंडे यांच्यावरही अन्याय झाला. त्यांनाही डावलण्याचे प्रयत्न करण्यात आले होते, असा खुलासाही त्यांनी केला.