पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

एकनाथ खडसे दिल्लीला, पक्षश्रेष्ठींना भेटण्याची शक्यता

भाजप नेते एकनाथ खडसे

राज्यातील भाजपच्या ओबीसी नेत्यांवर अन्याय होत असल्याची चर्चा सुरू झालेली असतानाच आता भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे सोमवारी दिल्लीला गेले आहेत. त्यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. ते दिल्लीमध्ये नक्की कोणाला भेटणार हे अद्याप समजलेले नाही. पण दिल्लीत पक्षश्रेष्ठींना भेटून राज्यातील परिस्थिती त्यांच्या कानावर घालण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

... अखेर राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला!

काही दिवसांपूर्वीच एकनाथ खडसे यांनी मुंबईत पंकजा मुंडे यांची भेट घेतली होती. या भेटीवेळी विनोद तावडे हे सुद्धा उपस्थित होते. या भेटीनंतर खडसे समर्थकांनी राज्यात ओबीसी नेत्यांवर अन्याय होत असल्याचे पत्रकारांना सांगितले होते. एकनाथ खडसे यांना यावेळी भाजपने तिकीट नाकारले होते. त्यांच्याऐवजी त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना मुक्ताईनगरमधून उमेदवारी देण्यात आली होती. पण विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. दुसरीकडे परळी मतदारसंघातूनही पंकजा मुंडे यांचा यावेळी पराभव झाला होता. तिथून त्यांचे बंधू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे विजयी झाले होते. 

मी आगीत अडकलोय, जिवंत वाचणार नाही; शाकीरचा गरोदर पत्नीला शेवटचा कॉल

भाजपतील काही नेत्यांमुळेच पंकजा मुंडे यांचा पराभव झाल्याचा आरोपही काही जणांनी केला आहे. अद्याप या संदर्भात पंकजा मुंडे यांनी कोणतेही वक्तव्य केलेले नाही. पण १२ डिसेंबर रोजी त्या या विषयावरील आपले मौन सोडण्याची शक्यता आहे.