पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

CM उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतर खडसे म्हणाले की,...

उद्धव ठाकरे आणि एकनाथ खडसे

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांची दिल्ली दरबारी जाऊन भेट घेतल्यानंतर मंगळवारी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्या मनात आपल्या पक्षाबद्दल खदखद असल्यामुळे खडसे मोठा निर्णय घेऊन भाजपला दणका देणार का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चेत होता. मात्र या भेटी राजकीयदृष्टिने घेतल्या नसून मतदारसंघातील कामे आणि इतर काही महत्त्वपूर्ण विषयाबाबतच्या शिफारशीसंदर्भात होत्या, असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. 

भाजपला विरोध करणारा 'देशद्रोही' हा भ्रम : उद्धव ठाकरे

दिल्लीतील शरद पवारांची भेट ही मतदारसंघातील सिंचनाच्या कामासंदर्भात घेतली होती. हा प्रकल्प साडे सहा हजार कोटींचा असल्याची माहिती देखील खडसेंनी प्रसारमाध्यमांना दिली. याच संदर्भात उद्धव ठाकरेंशीही बोललो, असे ते म्हणाले. केंद्र सरकार ही मदत द्यायला तयार आहे. यासाठी राज्याने शिफारस करणे आवश्यक असून उद्धव ठाकरेंनी तसे आश्वासन दिल्याचे त्यांनी सांगितले. 

ते पुढे म्हणाले की, १२ तारखेला माजी केंद्रीय मंत्री आणि स्वर्गीय भाजप नेते गोपिनाथ मुंडे यांच्या स्मरनार्थ गोपिनाथ गडावर स्वाभीमान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मी मंत्री असताना औरंगाबादमध्ये गोपिनांथ मुंडे यांचे स्मारक व्हावे यासाठी जागा दिली होती. मागील सरकारच्या काळात या स्मारकाला निधी मिळू शकला नाही. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली हे काम पूर्ण व्हावे अशी इच्छा आहे. यासाठी आवश्यक असणारा निधी देण्याचा उद्धव ठाकरेंनी शब्द दिला आहे. एवढेच नाही तर औरंगाबाद दौऱ्यावर आल्यानंतर त्या जागेला भेट देऊ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याचे ते म्हणाले. 

काश्मीरमधील स्थिती सामान्य पण काँग्रेसची..., अमित शहांचे प्रत्युत्तर

पक्षावर नाराज असल्याचे वृत्त चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी भाजपच्या नेत्यांनी मनधरणी केल्याचे वृत्त देखील फेटाळून लावले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि महाविकास आघाडीतील मंत्री बाळासाहेब थोरात यांना नाथाभाऊ आमच्यासोबत आले तर चांगलेच आहे, असे म्हटले होते. याअनुषंगाने त्यांनी विरोधी पक्ष तुम्हाला पक्षात घेण्यास उत्सुक असल्याचा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर खडसे म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यातील अनेक नेत्यांशी माझे चांगले संबंध आहेत. माझा राजकीय अनुभव लक्षात घेता त्यांना असे वाटले तर त्यात अयोग्य असे काहीच नाही. पण मी याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.