पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राज्यातील आठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

नयना गुंडे आणि श्वेता सिंघल

राज्यातील आठ सनदी अधिकाऱ्यांची बदलीचे आदेश आज मंत्रालयातून काढण्यात आले. यात अश्विन मुदगल, श्वेता सिंघल, नयना गुंडे यांच्यासह आठ अधिकाऱ्यांना नियुक्तीचे ठिकाण देण्यात आले आहेत. 

अधिकारी आणि नियुक्तीचे ठिकाण
ग्रामविकास विभागाचे उपसचिव अरिबम शर्मा यांची नियुक्ती हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली आहे. अश्विन मुदगल यांची नियुक्ती सहव्यवस्थापकीय संचालक सिडको, नवी मुंबई या रिक्त पदावर करण्यात आली आहे. 

भाजपकडून उदयनराजेंसह आठवलेंना राज्यसभेची उमेदवारी

पी. सिवा संकर यांची नियुक्ती अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे या रिक्त पदावर झाली आहे. सुनील चव्हाण यांची नियुक्ती सह-व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, औरंगाबाद या रिक्त पदावर करण्यात आली आहे. 

श्वेता सिंघल यांची नियुक्ती प्रकल्प संचालक, महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी, मुंबई या रिक्त पदावर झाली आहे. नयना गुंडे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पुणे महानगर परिवहन महामंडळ मर्यादित, पुणे यांची नियुक्ती उपमहासंचालक, यशदा, पुणे या रिक्त पदावर करण्यात आली आहे. 

ज्योतिरादित्य शिंदेंच्या भाजप प्रवेशामागे या नेत्याचा महत्त्वाचा रोल

आर. एस. जगताप यांची नियुक्ती सह आयुक्त. विक्रीकर, औरंगाबाद या रिक्त पदावर तर ए. ए. गुल्हाणे यांची नियुक्ती प्रकल्प व्यवस्थापक, जलस्वराज, (२) नवी मुंबई या रिक्त पदावर करण्यात आली आहे.