पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अकरावी प्रवेशात राज्य बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही - तावडे

विनोद तावडे

गेल्या काही दिवसांपासून अकरावी प्रवेशासंदर्भात विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात साशंकता असली, तरी राज्य सरकार विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ देणार नाही, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.

अकरावी प्रवेश प्रक्रिया नियमित वेळापत्रकानुसारच सुरु करण्यात येत असून, या प्रक्रियेला कोणताही विलंब झालेला नाही. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत सीबीएसई आयसीएसई बोर्डाच्या मुलांना प्रवेशात प्राधान्य मिळेल. मात्र, राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना प्रवेशात प्राधान्य मिळाणार नाही, अशी भीती अनाठायी व्यक्त करण्यात येत असून, अनेक पालक अकरावी प्रवेशासाठी आपल्याला भेटत असल्याचे तावडे यांनी सांगितले. राज्य मंडळ, सीबीएसई आणि आयसीएसई विद्यार्थ्यांचे समान पातळीवर मूल्यमापन होणे आवश्यक आहे. अकरावी प्रवेशासाठी काही नामांकित महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी चढाओढ असते. हे लक्षात घेता या महाविद्यालयांमधील जागा वाढविता येऊ शकतील का, याबाबत बैठक घेण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

वीज जाते आणि येते... मध्ये काय घडते?

राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना यंदा अंतर्गत गुण बंद करण्यात आल्याने त्यांना मिळालेल्या लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर अकरावीची प्रवेश प्रक्रिया होणार आहे. याच पद्धतीने सीबीएसई, आयसीएसई या विद्यार्थ्यांना त्यांच्या लेखी परीक्षेच्या गुणांच्या आधारावर अकरावीत प्रवेश देण्यात यावा, मात्र त्यांचे तोंडी परीक्षेचे अंतर्गत गुण प्रवेशावेळी ग्राह्य धरण्यात येऊ नये, अशी मागणी होत आहे. याबाबत राज्य सरकारच्यावतीने केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री, त्याचप्रमाणे सीबीएसई, आयसीएसई बोर्ड यांच्याशी चर्चा करण्यात येत आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:education minister vinod tawdes comment on elevanth admission process and maharashtra board