पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पालघर ४.८ रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्याने हादरले

पालघरमध्ये भूकंपाचे धक्के

पालघर पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्कांनी हादरले आहे. शुक्रवारी रात्रीपासून पालघरमध्ये भूंकपाचे धक्के बसत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. शनिवारी पहाटे ४.८ रिश्टर स्केल तिव्रतेचे भूकंपाचा धक्का बसला आहे. पालघर जिल्ह्यातील डहाणू, तलासरी परिसरातील काही गावांना भूकंपाने धक्के बसले.

दिल्लीमध्ये आज काँग्रेसची 'भारत बचाओ रॅली'; मोदी सरकारला घेरणार

पालघरमधील दापचरी, बोर्डी, कासा, उधवा, तलासरी, धुंदलवाडी, डहाणू इत्यादी भागात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. शुक्रवारी रात्रीपासून शनिवार पहाटेपर्यंत सौम्य आणि मध्यम स्वरूपाचे १५ धक्के बसल्याची गुजरात सिस्मोलोस्टिक रिसर्च सेंटरमध्ये नोंद झाली आहे.

दिल्लीत लाकडाच्या वखारीला भीषण आग

पालघरमध्ये रात्री ९ वाजून ५५ मिनिटांनी ३.४ रिश्टर स्केल तिव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला तर शनिवारी पहाटे ५ वाजून २२ मिनिटांनी ४.८ रिश्टर स्केल तिव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला आहे. पालघरमध्ये गेल्या २ वर्षापासून भूकंपाचे धक्के बसत आहे. याठिकाणचे नागरिक जीव मुठीत धरुन जगत आहे.

धक्कादायक! मालाडमध्ये ७ वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार