पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पालघरमध्ये भूकंपाचे धक्के; घरांना गेले तडे

भूकंपाच्या धक्क्यामुळे पालघरमध्ये घरांना तडे

पालघर पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरले आहे. पालघरच्या डहाणू आणि तलासरी तालुक्यातील अनेक गावांना भूकंपाचे धक्के बसले. रात्री १२ वाजून १८ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. गेल्या आठवडाभरात तीन वेळा भूकंपाचे धक्के बसले. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

मुंबईतील 'या' ६ विभागात कोरोनाचे ५३% रुग्ण

डहाणू आणि तलासरी तालुक्यात ३.१ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. यामुळे घरातील भांड्यांची पडझड झाली आणि अनेक घरांना तडे गेले. भूकंपाचे धक्के बसताच सावरोली, बोरमाळ आणि कोचाराई गावातील नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. अनेकांनी पूर्ण रात्र घराबाहेरच काढली. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. 

कनिकाचा दुसरा रिपोर्टही निगेटिव्ह, रुग्णालयातून डिस्चार्ज

गेल्या अनेक वर्षांपासून डहाणू आणि तलासरी तालुक्यातील गावांना भूकंपाचे धक्के बसत आहे. मागच्या आठवड्यात बुधवारी पालघरमध्ये मध्यरात्री १२ वाजून ३९ मिनिटांनी भूकंपचा धक्का बसला. पुन्हा शुक्रवारी रात्री ११ वाजता भूकंपाचा दुसरा धक्का बसला होता. त्यानंतर रविवारी मध्यरात्री भूकंपाचा धक्के बसला. लागोपाठ दिवसाआड भूकंपाचे धक्के बसल्याने पालघरमधील नागरिक भयभीत झाले आहेत. 

अमेरिकेत कोरोनामुळे २४ तासांत १२०० जणांचा मृत्यू