पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पालघर पुन्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरले; नागरिकांमध्ये भितीचे वातावरण

भूकंप मापनाचे छायाचित्र

पालघर पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्काने हादरले आहे. आज सकाळी पुन्हा पालघर, डहाणू, तलासरी तालुक्यात भूकंपाचे धक्के बसले. ३.५ रिश्टर स्केल तिव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. त्यामुळे पुन्हा एकदा पालघरकरांमध्ये भितेचे वातावरण आहे. भूकंपाच्या धक्काने काही नुकसान झाले नाही. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून या परिसरात भूकंपाचे धक्के बसत आहेत. 

शिवसेनेसोबत सत्ता स्थापनेला काँग्रेस कार्यकारिणीकडून हिरवा कंदील

पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धुंदलवाडीत आज सकाळी ७.२० वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. ३.५ रिश्टर स्केल ऐवढी या भूकंपाची तिव्रता होती. मात्र या भूकंपामुळे कोणतिही जिवितहानी किंवा घरांचे नुकसान झाले नाही असे ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांनी सांगितले. 

'शिवसेनेच्या नादाला लागून महाराष्ट्रातील काँग्रेसही संपेल'

नोव्हेंबर २०१८ पासून पालघर जिल्ह्यामध्ये भूकंपाचे धक्के बसत आहे. आतापर्यंत दोन हजार पेक्षा जास्त वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यामुळे याठिकाणच्या नागरिकांमध्ये भितीचे वातावरणा आहे. आज बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याची तिव्रता सौम्य होती. मात्र या आधी बसलेल्या भूकंपाच्या धक्क्यामुळे घरांना तडे गेले आहेत. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे भयभित झालेल्या गावकऱ्यांनी स्तलांतर केले आहे. 

उद्धव ठाकरेंकडून ठाण्याच्या महापौर आणि उपमहापौरांचा सत्कार