पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

दुष्काळग्रस्त मराठवाड्यात अद्याप पावसाची प्रतिक्षाच

दुष्काळाचे प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई, पुण्यासह राज्याच्या काही भागात पावसाला सुरुवात झाली असली, तरी अद्याप दुष्काळाने ग्रासलेल्या मराठवाड्यात पुरेसा पाऊस पडलेला नाही. जुलै महिन्याचा पहिला आठवडा संपायला आला, तरी मराठवाड्यातील नागरिकांचे डोळे अद्याप आकाशाकडेच लागले आहेत. मराठवाड्यात आतापर्यंत सरासरीच्या ५४ टक्के इतकाच पाऊस पडला आहे. राज्यातील इतर विभागांच्या तुलनेत हा नीचांकी पाऊस आहे. विशेष म्हणजे गेल्यावर्षी आतापर्यंत मराठवाड्यात सरासरीच्या १०० टक्के पाऊस पडला होता.

सध्या मराठवाड्यातील धरणांमध्ये ०.५६ टक्के इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्यावर्षी हीच टक्केवारी १३.१९ इतकी होती. नांदेड जिल्ह्यातील निम्न मणार या प्रकल्पामध्ये ११.२७ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्याचवेळी इतर प्रकल्पांमधील पाणीसाठा शून्यावर पोहोचला आहे. 

खेकड्यांनी भोकं पाडल्याने धरण फुटले, तानाजी सावंत यांचे अजब 'शास्त्र'

औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, मराठवाड्यात हिंगोली आणि नांदेड या दोन जिल्ह्यांमध्ये सरासरीच्या तुलनेत खूप कमी पाऊस पडला आहे. या दोन्ही ठिकाणी अनुक्रमे ४१.८ टक्के आणि ४२.९ टक्के इतका पाऊस पडला आहे. विभागातील एकूण आठ जिल्ह्यांपैकी सर्वाधिक पाऊस औरंगाबादमध्ये ६९.५ टक्के इतका पडला आहे. 

याच्या अगदी विरुद्ध स्थिती कोकण विभागात आहे. मुंबईमध्ये सरासरीच्या १५१.२ टक्के जास्त पाऊस पडला आहे. नाशिकमध्ये सरासरीच्या ८८.५ टक्के, पुण्यात सरासरीच्या ९२.३ टक्के आणि नागपूरमध्ये सरासरीच्या २००.९ टक्के जास्त पाऊस पडला आहे. कृषि खात्यातील पर्जन्यमान मोजणी विभागाने ही माहिती दिली.

नीतेश यांचं कृत्य चुकीचंच, नारायण राणेंनी मागितली माफी

औरंगाबादचे विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर म्हणाले, मराठवाड्यात चांगल्या पावसाची अपेक्षा आहे, ही वस्तुस्थिती आहे. विभागातील निम्यापेक्षा जास्त तालुक्यांमध्ये अद्याप पावसाची प्रतिक्षाच आहे. त्याचवेळी निम्म्या तालुक्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे ही आनंदाची बातमी आहे. कोणत्याही स्थितीचा मुकाबला करण्यासाठी आम्ही तयार आहोत.